Saturday, May 16, 2026
Homeक्राईम न्यूजओतूर अमृत लॉजमधील तरुणीच्या संशयास्पद मृत्यूस जबाबदार कोण?

ओतूर अमृत लॉजमधील तरुणीच्या संशयास्पद मृत्यूस जबाबदार कोण?

ओतूर येथील नामचीन रेस्टो बार लॉज AMRUT Resto Bar Lodge चे मालक विकास किसन हांडे यांच्या लॉजमध्ये आज शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी दुपारी एका तरुण ताठी मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती Otur Police Station यांना मिळताच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी API बैजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ओतूर हेल्थ पोस्टचे डॉ. गोरे यांनी संबंधित मुलगी मृत असल्याचे घोषित केले असून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. पोलीस नेहमीप्रमाणे ADR नोंद करून तपास करीत आहेत.
मात्र सर्वसामान्य जनतेसमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत :
1. संबंधित तरुण मुलगी परगावातील अथवा परिसरातील असताना ओतूरपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या या लॉजवर कशासाठी आली होती आणि तिला येथे कोण घेऊन आले होते?
2. ती मुलगी त्या लॉजवर कोणासोबत आणि किती दिवसांपासून वास्तव्यास होती?
3. लॉज प्रशासनाने संबंधित मुलगी व तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींची ओळखपत्रे, आधार कार्ड अथवा इतर नोंदी कायदेशीररीत्या घेतल्या होत्या का?
4. शवविच्छेदनामध्ये संबंधित मुलीला अमली पदार्थ, दारू अथवा इतर कोणते पदार्थ जबरदस्तीने देण्यात आले होते का, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता का, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
5. तिच्या मृत्यूचे खरे शास्त्रीय व वैद्यकीय कारण काय आहे?
हा मृत्यू नैसर्गिक नसल्याची भीती व चर्चा परिसरात व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे सर्वसामान्य जनता तसेच अनेक मुलींचे पालक धक्क्यात असून तरुण मुली चुकीच्या संगतीत किंवा दबावाखाली गेल्यास त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणाचा तपास केवळ ADR पुरता मर्यादित न ठेवता, संबंधित मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्व घटकांचा सखोल व निष्पक्ष तपास करून त्या बिचाऱ्या अबला मुलीच्या आत्म्यास न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाने व ओतूर पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिकाने पार पाडावी अशी जनतेची अपेक्षा आहे.

For Public Interest
Adv. Anil Bugde

Ad. Anil Bugde
Ad. Anil Bugdehttps://pil24news.com/
I am Ad. Anil Bugde, Activist Lawyer taking up Social Legal Issues concerning Larger Public Interest before the Forum of Public India, and also before the Court of Law and then mobilizing Human Power Organization to fight against all inhuman and insensitive approach of the mighty people and shady government agencies for the interest of Common Man, and also continuously striving for to see the Rule of Law is ensured or not in our Society.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments