ओतूर येथील नामचीन रेस्टो बार लॉज AMRUT Resto Bar Lodge चे मालक विकास किसन हांडे यांच्या लॉजमध्ये आज शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी दुपारी एका तरुण ताठी मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती Otur Police Station यांना मिळताच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी API बैजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ओतूर हेल्थ पोस्टचे डॉ. गोरे यांनी संबंधित मुलगी मृत असल्याचे घोषित केले असून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. पोलीस नेहमीप्रमाणे ADR नोंद करून तपास करीत आहेत.
मात्र सर्वसामान्य जनतेसमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत :
1. संबंधित तरुण मुलगी परगावातील अथवा परिसरातील असताना १५ ते २० किलोमीटर अंतर पार करून ओतूर येथे कशी आली आणि ओतूर येथील अमृत लॉजवर संशयास्पद परिस्थितीत मृत अवस्थेत कशी आढळून आली, हा गंभीर आणि चिंताजनक प्रश्न आहे. संबंधित तरुण मुलगी ओतूर येथील अमृत लॉजवर कशासाठी आली होती आणि तिला येथे कोण घेऊन आले होते?
2. ती मुलगी त्या लॉजवर कोणासोबत आणि किती दिवसांपासून वास्तव्यास होती?
3. लॉज प्रशासनाने संबंधित मुलगी व तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींची ओळखपत्रे, आधार कार्ड अथवा इतर नोंदी कायदेशीररीत्या घेतल्या होत्या का?
4. शवविच्छेदनामध्ये संबंधित मुलीला अमली पदार्थ, दारू अथवा इतर कोणते पदार्थ जबरदस्तीने देण्यात आले होते का, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता का, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
5. तिच्या मृत्यूचे खरे शास्त्रीय व वैद्यकीय कारण काय आहे?
हा मृत्यू नैसर्गिक नसल्याची भीती व चर्चा परिसरात व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे सर्वसामान्य जनता तसेच अनेक मुलींचे पालक धक्क्यात असून तरुण मुली चुकीच्या संगतीत किंवा दबावाखाली गेल्यास त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणाचा तपास केवळ ADR पुरता मर्यादित न ठेवता, संबंधित मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्व घटकांचा सखोल व निष्पक्ष तपास करून त्या बिचाऱ्या अबला मुलीच्या आत्म्यास न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाने व ओतूर पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिकाने पार पाडावी अशी जनतेची अपेक्षा आहे. कुणास ठाऊक, उद्या तुमचीच मुलगी अशाच संशयास्पद परिस्थितीत एखाद्या लॉजवर मृत अवस्थेत आढळली तर तुम्ही शांत बसणार का? आज इतरांच्या लेकराबाबत घडलेली घटना उद्या आपल्या दारात येऊ नये यासाठी पायापाशी पाहत बसू नका. उठा, आवाज द्या आणि त्या मृत आत्म्यास न्याय व शांती मिळवून देण्यासाठी एकत्र या.
सूत्रांच्या माहितीनुसार अमृत लॉज येथे बारसदृश वातावरण असून तेथे दारू विक्री तसेच बसून दारू पिण्याच्या गोष्टी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित अमृत लॉजला दारू विक्री व ग्राहकांना बसून मद्यपान करण्यासाठी Bombay Prohibition Act व संबंधित नियमांनुसार आवश्यक परवाना व परमिट आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
तसेच ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली बारचे फलक लावून अवैध दारू विक्रीचे उद्योग सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. विशेषतः कल्याण-नगर रोडवर मढपासून आळेफाटा दरम्यान अशा प्रकारांमुळे अनेक धोकादायक अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. Issued for Public Interest
Adv. Anil Bugde, High Court, Bombay.
ओतूर अमृत लॉज रेस्टो बार मधील तरुणीच्या संशयास्पद मृत्यूस जबाबदार कोण?
RELATED ARTICLES


