Homeक्राईम न्यूजउत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार २०२५-२०२६ : मानकरी पारगाव पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार २०२५-२०२६ : मानकरी पारगाव पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पारगाव पोलीस ठाण्याने उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार २०२५-२०२६ पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सध्या या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सचिन कांडगे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रभारी पोलीस अधिकारी सचिन कांडगे यांनी यापूर्वी ओतूर पोलीस ठाणे, पुणे येथे तसेच त्यानंतर रहिमतपूर पोलीस ठाणे, सातारा येथे कार्यरत असतानाही पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांच्यात अत्यंत व्यापक, विश्वासपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या, तंटे व वाद सामंजस्याने सोडविणे, गावातील शांतता टिकविणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची त्या दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतली गेली नसली, तरी यावेळी पारगाव पोलीस ठाण्याच्या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची, लोकाभिमुख कार्यपद्धतीची आणि जनसंपर्क कौशल्याची योग्य दखल घ्यावीच लागली. खऱ्या अर्थाने पोलीस अधिकारी हा केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारा नसून, जनतेचा विश्वास संपादन करून समाजात शांतता व सुरक्षितता निर्माण करणारा लोकाभिमुख सेवक असतो, याचे सचिन कांडगे यांचे कार्य हे एक उदाहरण आहे.

पोलीस ठाण्याची कार्यक्षमता, कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी, गुन्हे प्रतिबंध, तपासातील गुणवत्ता, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, अभिलेख व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी सुसंवाद अशा विविध निकषांच्या आधारे उत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड केली जाते. या सर्व आवश्यक निकषांची पूर्तता पारगाव पोलीस ठाण्याने केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (SP IG) यांचे रीडर सतीश गुरव आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे रीडर दत्ताजी मोहिते यांनीही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

सदर पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते हीच प्रभावी पोलीस व्यवस्थेची खरी ताकद आहे. गुन्हेगारी रोखणे, गावातील शांतता व सुव्यवस्था टिकवणे, सामाजिक सलोखा जपणे, महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहणे आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. पोलीस प्रशासनाने जनतेला विश्वासात घेऊन काम केल्यास नागरिकही कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या प्रक्रियेत जबाबदार भागीदार बनतात.

पारगाव पोलीस ठाण्याच्या या यशामागे प्रभारी अधिकारी सचिन कांडगे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाची कर्तव्यनिष्ठा, तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य, विश्वास आणि लोकसहभाग यांचा महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित होतो.

हा पुरस्कार म्हणजे केवळ एका पोलीस ठाण्याचा गौरव नसून, पोलीस आणि जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांतून सुरक्षित व सुजाण समाजनिर्मितीच्या दिशेने टाकलेले यशस्वी पाऊल आहे.

प्रभारी अधिकारी सचिन कांडगे आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाचे तसेच सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!


For Larger Public Interest

Ad. Anil Bugde
Advocate, High Court, Bombay

Ad. Anil Bugde
Ad. Anil Bugdehttps://pil24news.com/
I am Ad. Anil Bugde, Activist Lawyer taking up Social Legal Issues concerning Larger Public Interest before the Forum of Public India, and also before the Court of Law and then mobilizing Human Power Organization to fight against all inhuman and insensitive approach of the mighty people and shady government agencies for the interest of Common Man, and also continuously striving for to see the Rule of Law is ensured or not in our Society.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Captcha Verification *Captcha loading...

Most Popular

Recent Comments