Monday, April 20, 2026
Homeक्राईम न्यूज३ महिन्यांच्या कॅश कोर्समधून ‘पर्मनंट जॉब सिक्युरिटी’चे आमिष? – Manalies Institute of...

३ महिन्यांच्या कॅश कोर्समधून ‘पर्मनंट जॉब सिक्युरिटी’चे आमिष? – Manalies Institute of Hotel Management च्या सोशल मीडियावरील जाहिरातीवर संशय? तरुणांची फसवणूक होण्याची भीती!”

मा. पोलीस अधीक्षक,
सांगली जिल्हा, महाराष्ट्र.
मा. महोदय,
विषय: कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली येथील “मनालीस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट” या संस्थेबाबत चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत.
मी, अधोलिखित, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही तक्रार सादर करीत आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून “मनालीस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट”, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली या नावाने एक संस्था “३ महिन्यांचा कॅश कोर्स” देत असल्याच्या जाहिराती प्रसारित होत आहेत. या जाहिरातींमध्ये तरुणांना सहज नोकरी मिळण्याचे आमिष दाखविले जात आहे.
सदर जाहिराती “अनिल माने” (यूजरनेम: @anilmane05550) या नावाने प्रसारित केल्या जात असून, इच्छुकांना खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
9696009797
9049977222
9049944555
मी स्वतः व इतरांकडूनही या क्रमांकांवर अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच प्राथमिक माहितीनुसार हे क्रमांक वेगवेगळ्या व असंबंधित व्यक्ती/व्यवसायांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे दिसून येते, जे अत्यंत संशयास्पद आहे.
याशिवाय, सदर जाहिरातींमध्ये संस्थेची नोंदणी, शासन मान्यता, कोर्सचे शुल्क, अभ्यासक्रमाची माहिती किंवा नोकरी संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यावरून ही संपूर्ण कार्यपद्धती संशयास्पद वाटत असून, निष्पाप तरुणांची आर्थिक व मानसिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
म्हणून आपणास नम्र विनंती आहे की:
सदर संस्थेची कायदेशीर नोंदणी व अस्तित्वाची तात्काळ चौकशी करावी,
संबंधित व्यक्ती व मोबाईल क्रमांकांची सत्यता तपासावी,
जाहिरातींद्वारे जनतेची दिशाभूल होत असल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी,
भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
ही तक्रार पूर्णतः सार्वजनिक हितासाठी करण्यात येत असून, कोणत्याही निष्पाप नागरिकाची फसवणूक होऊ नये हा एकमेव उद्देश आहे.
आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती.
Issued for Public Interest. आपला विश्वासू,
Advocate Anil Bugde,
High Court, Mumbai.

Ad. Anil Bugde
Ad. Anil Bugdehttps://pil24news.com/
I am Ad. Anil Bugde, Activist Lawyer taking up Social Legal Issues concerning Larger Public Interest before the Forum of Public India, and also before the Court of Law and then mobilizing Human Power Organization to fight against all inhuman and insensitive approach of the mighty people and shady government agencies for the interest of Common Man, and also continuously striving for to see the Rule of Law is ensured or not in our Society.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments