“महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुन्हा एकदा राज्यव्यापी पातळीवर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. याचे प्रमुख श्रेय सध्याचे पोलीस महासंचालक संजीव सिग्बल Sanjiv Sigbal IPS, यांच्या ‘नो-नॉन्सेन्स’ कार्यपद्धतीला आणि युनिटनिहाय दिलेल्या ‘फ्री हँड’ धोरणाला जाते. या धोरणामुळे राज्यभरातील भ्रष्ट लोकसेवक, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर लाचलुचपत विभागामार्फत प्रभावी कारवाई होत असून त्यांना जेरबंद केले जात आहे. हीच गती कायम राहिली तर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळून, कायदेशीर कामांसाठी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करण्याची गरज उरणार नाही.”
Issued for public interest by Ad. Anil Bugde, High Court, Bombay.


