माणूस मोठा की न्याय? मीही या प्रत्येकासमोर (तत्त्वशून्य, मूल्यहीन, चारित्र्यहीन भ्रष्टाचारी) मान झुकवली असती, तर कदाचित मी प्रगतीची शिखरे चढलो असतो. पण ‘जी हुजूर’ म्हणणे माझ्या तत्त्वात कधीच नव्हतं. माझा दुसरा कोणताच दोष नव्हता. क्षण भर जरी मी माझा जमीर विकला असता, तर आज मीही श्रीमंत असतो. पण माझं ध्येय श्रीमंत होणं नव्हे, तर माणूस म्हणून महान राहणं आहे. कारण पैसा क्षणिक असतो, पण तत्त्वं पिढ्यान पिढ्या जिवंत राहतात. राजकारणाला जनतेची जाणीव असावी, शासनाला सेवाभाव असावा, न्यायव्यवस्थेला न्यायाचा ध्यास असावा, आणि जनतेनेही एकमेकांवर विश्वास आणि जागरूकता ठेवावी. जेव्हा सामान्य माणूस स्वार्थापेक्षा सत्याची निवड करतो, तेव्हा लोकशाहीचे तिन्ही स्तंभ आपोआप आपल्या कर्तव्याची आठवण ठेवतात. माणूस कदाचित उशिरा जिंकतो, पण त्याचा विजय कधीच विकत घेतलेला नसतो. अॅड. अनिल बुगदे,
मुंबई उच्च न्यायालय
सामाजिक कार्यकर्ते व अधिवक्ता.
देशहिताला प्राधान्य द्या; जागरूक नागरिक बना!
RELATED ARTICLES


