पंढरपूरची वारी म्हणजे भावनेचा महापूर,
पण एक प्रश्न मनाला टोचतो –
विठोबा खरोखर गाभाऱ्यातच आहे का?
जर देव फक्त मूर्तीत असता,
तर संत ज्ञानेश्वरांनी वेदांचे भाष्य रस्त्यावर बसून का केलं असतं?
तुकारामांनी आपल्या आयुष्यातील दुःख कवितेत ओतून का मांडलं असतं?
कारण देव म्हणजे एक मूर्ती नाही –
देव म्हणजे करुणा, प्रामाणिकपणा, त्याग, आणि जागृती.
आज मात्र ही भक्ती दांडपट्टा घेणाऱ्या राजकारणाच्या कुबड्यांवर चालतेय.
मुख्यमंत्री पहिली पूजा करतो,
पण जो गरीब वारकरी पायात फाटकी चप्पल घालून शेकडो किलोमीटर चालतो —
तो दर्शनासाठी रांगेत तासन्तास उभा!
हे कोणत्या विठोबाच्या नावाने?
वारकऱ्यांनो, एक लक्षात ठेवा –
खरा विठोबा तुमच्या घरात आहे,
शेतात आहे, कामात आहे,
मनात आहे.
पंढरपूरला जरूर जा —
पण देवाच्या शोधात स्वतःच्या मनाकडेही बघा.
कारण देव शोधायचा असेल,
तर डोळे बंद करावेत,
आणि हृदय उघडावं.
“विठोबाच्या मावळतीत राहूनच खऱ्या भक्तीचा मार्ग सापडतो.”
— ॲड. अनिल बुगडे, सच्चा वारकरी भक्त