गोविंद पंढरीनाथ शिंदे, जनतेचे मामलेदार प्रांतसाहेब महसूल खात्यातील वर्ग-१ अधिकारी व दोन तालुक्यांचे दंडाधिकारी म्हणून ओळख असलेले अधिकारी, यांना आज शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), पुणे यांनी मंचर ला अटक केली.
तक्रारदाराकडून इमारतीचे CC (Completion Certificate) मिळवून देण्यासाठी शिंदे यांच्याकडून २ लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सापळा रचून ACB ने मंचर येथील त्यांच्या कार्यालयातून त्यांना रंगेहात पकडले. पुढे मंचर पोलीस स्टेशनमार्फत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
सदर अधिकारी जुन्नर व आंबेगाव तालुक्यात आपल्या दलालांमार्फत विविध गैरप्रकार करत असल्याची चर्चा होती. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केल्याची माहिती समोर येत आहे. हा अधिकारी एका मोठ्या राजकीय नेत्याचा जावई असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्या सासऱ्यांचा संबंध अहिल्यानगर परिसरातील एका साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांशी असल्याचे बोलले जाते.
शिर्डी येथेही त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या, मात्र राजकीय पाठबळामुळे ते कारवाईपासून वाचत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काही दिवसांपूर्वी ओझर विघ्नहर्ता येथील स्वामी समर्थ मंदिरातील पुजारी कुलवडे मामांवर कवडे गँगने मारहाण केली होती. त्या प्रकरणात एका महिला पोलीस पाटीलचा समावेश होता. त्यांच्या विरोधात ओतूर पोलीस स्टेशन येथे FIR क्र. ४६७/२०२४ दाखल असतानाही, शिंदे यांनी दिनांक ४.१०.२०२५ च्या आदेशाद्वारे त्यांना पुन्हा पोलीस पाटील पदावर नियुक्त केल्याचे समोर आले आहे.
असेही सांगितले जाते की, ओतूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन API थत्ते यांनी त्या पोलीस पाटीलच्या बाजूने सकारात्मक अहवाल दिल्यामुळेच त्यांची पुनर्नियुक्ती झाली. यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पुणे जिल्ह्यातील या महत्त्वाच्या दोन तालुक्यांमध्ये भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन अशा भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध कायदेशीर लढा उभारण्याची वेळ आली आहे.
चला, आपला तालुका भ्रष्टाचारमुक्त करूया.
साथ द्या — आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
जनहितार्थ प्रसिद्ध
अधिवक्ता वकील श्री अनिल बुगदे, उच्च न्यायालय, मुंबई द्वारा जारी.


